---Advertisement---
---Advertisement---
पाचोरा : शहरातील एका डॉक्टरला फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात देत २ कोटींची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या डॉक्टरांनी अखेर पोलिसात धाव घेत अज्ञाता विरोधात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पाचोरा शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत स्थानीय पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार ( १३ जुलै) ते (२२ जुलै) दरम्यान अज्ञात आरोपीने शहरातील एका डॉक्टरांना ‘तुझे नर्स सोबत असलेले फोटो कलेक्टर,मंत्रालयापर्यंत व्हायरल करून जीवन उध्वस्त करु. अशी धमकी ई-मेल, फोन, चिट्ठीद्वारे देण्यात आली. तसेच नर्स सोबतचे असलेले आक्षेपार्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २ कोटींची मागणी करण्यात आली.
---Advertisement---
तसेच पोलिसाकडे जाऊ नये दम ही या ई-मेल, फोन, चिट्ठीद्वारे भरण्यात आला. सततच्या या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर त्या डॉक्टरांनी पाचोरा पोलिसात धाव घेऊन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे. पोलीस आता मिळालेला मोबाईल क्रमांक,चिठ्ठ्या व ई-मेल च्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.