पारोळा पोलिसांची अवैध दारू विक्रेते, दारू भट्टीवाल्यांवर धडक कारवाई

तरुण भारत लाईव्ह  न्यूज पारोळा :येथील पोलिसांनी गावठी दारू विक्रेते, देशी दारू विक्रेते व दारू भट्टीवाल्यावर 18 दिवसात 25 छापे टाकून 1,78,265 रुपयांचा मुद्देमालावर केली धडक कारवाई केली. 25 आरोपींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली. त्यामुळे दारू विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

गावठी दारू भट्टीवाले शांताराम चैत्राम पारधी रा. शेवाळे खुर्द यांचे दारू भट्टीवर छापा टाकून 56 हजारांचा मुद्देमालाचा नाश केला. तसेच अण्णा धर्मा वडर रा. टिटवी यांची व सतीश आनंदा भिल रा. पारोळा यांची दारुभट्टी फोडून 82 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. तसेच पारोळा, तरडी येथील 5 देशी दारू विक्रेते, राजवड, दळवेल, मराठखेडा, सारवे, भिलाली, पारोळा, रत्नापिंप्री, जोगलखेडा, शेवाळे खुर्द, टिटवी, बहादरपूर, महालपूर येथील 17 अवैध गावठी दारू विक्रेते यांच्यावर छापे टाकून 25 आरोपींवर गुन्हेे दाखल केले.

एकूण 1 लाख 78 हजार 265 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून धडक कारवाई कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड, रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, शेखर डोमाळे, बापू पाटील, जयवंत पाटील, इकबाल शेख, हेकॉ सुधीर चौधरी, हेकॉ नाना पवार, हेकॉ किशोर पाटील, हेकॉ विजय भोई, पोना संदीप सातपुते, पोना प्रवीण पाटील, पोना प्रवीण पारधी, पोना प्रदीप पाटील, पोना योगेश जाधव, पोना ज्ञानेश्वर सपकाळे, पोकॉ किशोर पाटील, पोकॉ राहुल कोळी, पोकॉ हेमचंद्र साबे, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ आशिष गायकवाड, पोकॉ अभिजित पाटील, पोकॉ नरेंद्र पाटील, पोकॉ निकम, पोकॉ दुसाने यांनी केली.