PAN Card Update: सरकारने पॅन 2.0 योजना लाँच केली असून, या योजनेद्वारे डुप्लिकेट पॅनकार्ड पूर्णपणे हटवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील, तर तुम्हाला आता सावध राहण्याची आवश्यकता आहे. कारण आयकर विभागाने डुप्लिकेट पॅनकार्ड धारकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असणे बेकायदेशीर
प्राप्तिकर कायदा 1961 नुसार, कोणत्याही करदात्याला एकापेक्षा जास्त पॅनकार्ड ठेवता येणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने चुकून किंवा जाणूनबुजून दुसरे पॅनकार्ड बनवले असेल, तर त्याने ते तात्काळ सरेंडर करणे आवश्यक आहे. अन्यथा, सरकार त्या व्यक्तीवर कडक कारवाई करेल. नवीन नियमानुसार, जर तुम्ही तुमचे अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर केले नाही, तर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
हेही वाचा : संगीतम ट्रॅव्हल्सची बेफिकीर सेवा उघड; प्रवाशांना रात्री ३:३० वाजता सोडले रस्त्यावर
पॅन 2.0 योजना काय आहे?
सरकारने अलीकडेच पॅन 2.0 योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश पॅन आणि टॅनचे व्यवस्थापन अधिक सुलभ आणि आधुनिक करणे आहे. ही योजना लागू झाल्यानंतर डुप्लिकेट पॅनकार्ड दूर केली जातील आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला आळा घालता येईल. याशिवाय, पॅन आणि टॅनशी संबंधित प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि सुलभ होईल.
तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असल्यास काय करावे?
जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील, तर तुम्ही लगेचच अतिरिक्त पॅन सरेंडर करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
NSDL किंवा UTIITSL पोर्टलवर भेट द्या.
“पॅन सरेंडर” पर्याय निवडा आणि आवश्यक फॉर्म भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज सबमिट करा.
सरेंडर केलेल्या पॅनकार्डची पावती प्राप्त करा.
सरेंडर करताना महत्त्वाच्या गोष्टी:
तुमचे वैध पॅनकार्ड आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.
तुमचे बँक खाते, टॅक्स रेकॉर्ड आणि गुंतवणुकीशी संबंधित सर्व माहिती अचूक असावी.
योग्य आणि वैध पॅनकार्ड सरेंडर करू नका, फक्त डुप्लिकेट किंवा अनावश्यक पॅनकार्डच सरेंडर करा.