Jalgaon : जळगाव – ममुराबाद रस्त्यावर भरधाव मालवाहू ट्रक व दुचाकीच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यर्थी हा ममुराबाद येथील फार्मसी महाविद्यालयात जात असतांना जळगाव – ममुराबाद रस्त्यावर झालेल्या अपघातातात त्याचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार ममुराबाद जवळील फार्मसी महाविद्यालयात जाणाऱ्या दुचाकीला भरधाव 407 मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने फैजल मुस्ताक पटेल (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात त्याचा मित्र वसिक खान युसुफ खान गंभीर जखमी झाला आहे. फैजल हा बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. आज सकाळी 10 वाजता तो वसिकसोबत महाविद्यालयात जात असताना ममुराबाद रोडवर हा भीषण अपघात घडला.
हेही वाचा : धक्कादायक ! औषध सांगून विद्यार्थिनींना द्यायचा दारू अन्…, शिक्षकाचा संतापजनक प्रकार
अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी विद्यर्थ्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता फैजल मुस्ताक पटेल याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर वसिक खान युसुफ खान गंभीर जखमी आहे. फैजल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी फैजलचा मृतदेह बघताच एकच हंबरडा फोडला. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.