PM Modi On Congress: हरियाणात बहुमताने सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलितांनी व शेतकऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यावर भाष्य केले आहे. हरियानाच्या शेतकऱ्यांना भाजपच्या योजनांमुळे खूप आनंद आहे,काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकविण्यापासून ते हिंदू समाजात आग लावण्याचा पर्यंतचा प्रयत्न करून जनतेत असंतोष निर्माण केला, परंतु काँग्रेसच्या सर्व प्रयत्नांचा फरश्या पाडत व कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता हरियानाच्या जनतेने काँग्रेसला धक्का देत भाजपला साथ दिली. असे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले. हरियाणातील घवघवित यशानंतर भाजपचे लक्ष आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. हरियाणातील विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी 9 ऑक्टोबर 2024 रोजी डिजिटल माध्यमातून महाराष्ट्रात 7,600 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी केली. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर कडाडून निशाणा साधला.
पीएम मोदी म्हणाले, “काँग्रेस पूर्णपणे जातीय आधारावर निवडणूक लढवते हिंदू समाजाला तोडणे आणि त्यांच्यात जातीय फूट पाडणे हा त्यांनी विजयाचा फॉर्म्युला बनवला आहे. पुढे मोदी म्हणाले, “काँग्रेसला हिंदू समाज कोणत्याही प्रकारे पेटवत ठेवायचा आहे. काँग्रेसचे धोरण हे हिंदूंच्या एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवणे हेच आहे. त्यांना माहित आहे की जितके हिंदू विभाजित होतील तितका आपल्याला फायदा होईल. काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवून जनतेत असंतोष निर्माण केला,परंतु भाजपच्या योजनांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे. असही मोदी यावेळेस म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठीशी राहील – पंतप्रधान मोदी
पीएम मोदी म्हणाले, “माझा ठाम विश्वास आहे की, आज समाज तोडण्याचे जे षड्यंत्र काँग्रेसकडून चालू आहे, ते महाराष्ट्रातील जनता हाणून पाडेल. देशाचा विकास हा सर्वोपरि ठेवत, महाराष्ट्रातील जनतेने संघटित होऊन भाजप, महायुतीला साथ देतील असा माझा विश्वास आहे.