---Advertisement---
---Advertisement---
Jalgaon News : अल्पवयीन मुलीचा तिच्या आईच्या मित्राने विनयभंग केला. हा प्रकार पीडितेने तिच्या आईच्या कानावर टाकला असता तिने दुर्लक्ष करत संशयित मित्राच्या कृत्याचे समर्थन केले. पीडितेने पोलिसात धाव घेत कैफियत मांडली. या प्रकरणी पीडितेच्या आईसह तिचा प्रियकर अशा दोघांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार, १५ फेब्रुवारी २०१५ रोजी पीडितेचे वडील घरी नव्हते. ही संधी हेरत संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित आरोपी पिझ्झा पार्सल घेऊन पीडितेच्या घरी आला. पीडितेची आई चहा बनविण्यासाठी किचनमध्ये होती. त्यावेळी संशयिताने पीडितेशी लज्जास्पद कृत्य केले. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितला असता तू काही पण सांगत नको जावु, असे बोलत पीडितेची बोलती बंद केली.
असलेल्या ॲकेडमी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पीडितेचे वडील घरी नव्हते. संशयित तरुण पीडितेच्या घरी आला. पीडितेच्या आई समक्ष पीडितेच्या बाजुला बसून तिच्याशी लज्जास्पद व किळसवाणे कृत्य करु लागल्याने पीडिता संशयिताचा हात झटकत बाजुला झाली. दरम्यान १२ जून २०२५ रोजी पीडिता शिकत येथे पीडितेची आई रिसेप्शनीस्ट या कामास असताना पीडिता मुलगी क्लासबाहेर पडताना जिन्यामध्ये संशयिताने पीडितेशी लज्जास्पद कृत्य केले. या वारंवारच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने पोलिसात कैफियत मांडली. त्यानुसार मयूर शिंपी तसेच पीडितेची आई अशा दोघांवर पोक्सो अंतर्गत बुधवारी (२३ जुलै) दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर हे तपास करीत आहेत.