---Advertisement---

Pachora Crimes : पोलिस प्रशासनाची लक्तरे वेशीवर, 50 रुपयांची लाच घेताना पोलीस कॅमेरात कैद

by team
---Advertisement---

पाचोरा : ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य महारष्ट्र पोलिसांचे आहे. मात्र या ब्रिदवाक्याला काळिमा फासण्याचा प्रकार सध्या राज्यात सुरु आहे. याचा पुन्हा प्रत्येय आला. ट्रक चालकांकडून 50 रुपयांची लाच घेणं पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. या प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पवन पाटील असं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाटील हा पाचोरा हद्दीतील रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला बाजूला घ्यायला लावतो आणि चालकाला गाडी कुठे चालवतोय म्हणून जाब विचारताना दिसत आहे. नंतर पोलीस कर्मचारी लाच ट्रक चालकाला लाच मागायला सुरुवात करतो. यावर ट्रक चालक 50 रुपयांची नोट पोलीस कर्मचाऱ्याच्या हातात देतो.

हेही वाचा : लव्ह मॅरेज करूनही परपुरुषाशी संबंध, रंगेहात पकडणाऱ्या पतीला तुकडे करून ड्रमध्ये भरण्याची धमकी

ट्रकचालकानं 50 रुपयांची नोट दिल्यावर किमान शंभर तरी करा.. पन्नास रुपयाची लायकी आहे का आमची असं म्हणत पन्नास चालणारच नाही शंभर तरी दे. आता सुट्टे नाहीत असे ट्रकचालकाने पोलीस कर्मचाऱ्यास सांगितल्यानंतर त्यानी आधी दिलेली 50 रुपयांची नोट खिशात टाकत पोलीस कर्मचाऱ्यानं ट्रकचालकाला पुढे सोडलं. याचा व्हिडिओ ट्रकवर बसलेल्या एका व्यक्तीने नकळत केला आहे.

या व्हिडिओत आणखी दोन वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याने त्यांचीही भूमिका संशयास्पद आहे. या व्हिडिओनंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह त्याला साथ देणाऱ्या अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्याना निलंबीत केले आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment