जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातदेखील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने मंगळवारपासून नाकाबंदी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान पोलिसांनी एकाच दिवसात १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपयांची रोकड जप्त केली आहे. रोकड नेमकी कुणाची ? याबाबत प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.
चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे हद्दीतील जामडी येथे लावण्यात आलेल्या एसएसटी पॉइंटवर दुपारी १ वाजेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान नागदकडून चाळीसगावकडे जात असलेल्या महिंद्रा वाहनाची तपासणी केली. या वाहनामध्ये ७ लाख २२ हजार ५०० रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी रक्कम जप्त केली असून ट्रेझरी येथे जमा केली आहे.
कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील फरकांडे फाट्याजवळ ऑल आऊट स्किम नाकाबंदी करीत असताना एरंडोलकडून येणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा ही सायंकाळी ५.४५ वाजेच्या दरम्यान थांबवून तपासणी केली असता ५०० व १०० च्या नोटा मिळून आल्या. पोलिसांनी रक्कम तपासली असता १ कोटी ४५ लाख रुपये असल्याचे समजते. भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पारोळा चौफुली भडगाव येथे नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी करताना १ लाख ४९ हजार रुपये रोख मिळून आली. ही रक्कम पुढील कारवाईसाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील एफएसटी पथक क्र.३ यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
जामनेर पोलीस स्टेशन हदीतील नेरी येथे नाकाबंदी दरम्यान एक इसम ाच्या ताब्यातून ४ लाख ४६ हजार राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली असून पैशांच्या व्यवहारावर प्रशासनाची नजर आहे. दोन दिवसापूर्वी पुणे पोलिसांनी ५ लाखांची रोकड जप्त केली होती. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात ५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. त्यानंतर जळगावात देखील पोलिसांनी प्रशासनाच्या सहकायनि एकाच दिवसात १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपयांची रोकड जप्त केली आहे.