---Advertisement---
गावठी हातभट्टीतून दारु तयार केली जात होती. ही गोपनीय माहिती मिळताच शिंदखेडा पोलिसांच्या पथकाने कब्रस्थानचे पाठीमागे तसेच दराणे शिवारातील शिव रस्त्यालगत शनिवारी (१९ जुलै) छापा टाकुन हातभट्टीचे कच्चे रसायन, गावठी दारु असा सुमारे ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत जागेवर नष्ट केला. या प्रकरणी दोन संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
शिंदखेडा शहरातील कब्रस्थानचे पाठीमागे सुरेश दिपा मालचे ( रा. कब्रस्थान जवळ शिंदखेडा) हा हातभट्टी लावून गावठी दारु गाळतांना पथकाला मिळून आला. त्याठिकाणी टाकलेल्या छाप्यात हातभट्टी, पोकळ प्लॅस्टिकची नळी, गुळ नवसागर मिश्रीत बॉश तसेच तयार हातभट्टीची बनावट दारु असे एकुण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन जागेवर नष्ट केला.
तालुक्यातील दराणे गावाच्या शिवारात शिव रस्त्यालगत विठोबा भगवान भिल (रा. दराणे) याने गावठी दारु तयार करण्यासाठी हातभट्टी लावली होती. पथकाने याठिकाणी छापा टाकून प्लॅस्टिक नळी, गुळ नवसागर मिश्रीत वॉश तसेच तयार बनावट दारु असे एकुण २७,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवर नाश केला.
याप्रकरणी दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक वैभव देशमुख, हेमंत फुलपगारे, हवालदार अकील पठाण, हवालदार साबीर शेख, हवालदार प्रशांत पवार, पोकॉ विशाल सोनवणे, पोकॉ रुपेश चौधरी, पोकॉ दिनेश देवरे, पोकॉ राकेश ठाकुर, पोकॉ पंकज कुलकर्णी, पोकॉ पुनमचंद कोळी, चापोहेकॉ नागेश शिरसाठ, चापोकॉ चेतन माळी, मपोकॉ माधुरी चव्हाण, मपोकों वर्षा गोपाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.