प्रभा आयुर्वेद रथयात्रा उद्या जळगावात

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । राज्यातील जनतेमध्ये आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार व जनजागृती व्हावी, या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रभर ‘प्रभा आयुर्वेद रथयात्रा’ सुरू आहे. जळगाव शहरात उद्या १५ रोजी या यात्रेचे आगमन होत आहे. विशेष म्हणजे, जनतेला वनस्पतींचा परिचय व्हावा, यासाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबीर कुठे? 
मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर हॉटेल मोरको, कोर्ट चौक येथे सकाळी १० ते १२ दरम्यान भरवण्यात येत आहे.

रथयात्रेला काव्यरत्नावली चौकापासून सुरवात
रथयात्रेचा प्रारंभ जळगाव जिल्हा वैद्य समूह यांचे मार्फत सकाळी ९ ते १०:३० दरम्यान काव्यरत्नावली चौक पासून सुरू होणार आहे. त्यानंतर प्रत्येक चौकात पुष्पवृष्टी व सामान्य लोकांनी दर्शन घ्यावे, यासाठी आयुर्वेद पालखीचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेने आपले आरोग्य निरोगी राहावे या दृष्टिकोनातून या रथयात्रेस दर्शन देऊन उपकृत करावे.

विविध उपक्रम
रथयात्रेमध्ये जनतेला दिनचर्या ऋतुचर्या शोधन चिकित्सा व औषधी चिकित्सा यांचे मार्गदर्शन आकर्षित फलकाद्वारे करण्यात येणार आहे त्याचबरोबर लेझीम पथक सर्व वैद्य समूह सनई चौघडा पूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठ वैद्य यांचा सत्कार व आयुर्वेद रथ यांचे स्वागत आदी उपक्रम यावेळी करण्यात येणार आहे. सर्वांनी या रथयात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन अयोजकांतर्फे करण्यात आली आहे.