Jalgaon News: स्वामित्व योजने अंतर्गत ६० गावांमध्ये होणार सनद वितरण

जळगाव : जिल्ह्यात स्वामित्व योजने अंतर्गत ६० गावांमध्ये सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन पद्धतीने ५० लाख मालमत्ता पत्रकांचे वितरण करतील व  लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत.

राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग, आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामित्व योजनाची अमंल बजावणीकरण्यात येत आहे. गावातील मालमत्ता धारकांना मालमत्ता पत्रक वितरित करून त्यांना दस्तऐवजाचा हक्क प्रदान करणे करण्यात येत आहे. गावातील मालमत्ता धारकांना मालमत्ता पत्रक वितरित करून त्यांना दस्तऐवजाचा हक्क प्रदान करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.  या योजनेच्या अंतर्गत गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका तयार करणे, तसेच गावातील मालमत्तांचे जी.आय.एस. प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करणे, या बाबींचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यातील स्वामित्व योजनेत अंतर्गत ७ तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. यात बोदवड तालुक्यात १६ गावे, जळगाव तालुक्यात १ गाव, चोपडा तालुक्यात २ गावे,  मुक्ताईनगर तालुक्यात ६ गावे, यावल तालुक्यात ५ गावे, , भुसावळ तालुक्यात ३ गावे,  आणि पाचोरा तालुक्यात २७ गावे यांचा समावेश आहे. एकूण ६० गावांमध्ये मालकी हक्काची सनद वितरित केली जाणार आहे.

 

यासाठी जिल्हा अधीक्षक एम. पी. मगर यांनी गावातील नागरिकांना स्वामित्व योजने अंतर्गत मालकी हक्काची सनद प्राप्त करण्याचे आवाहन प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.