---Advertisement---

भुसावळ विभागाच्या विभागीय व्यवस्थापकपदी पुनीत अग्रवाल

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) पदाचा कार्यभार भारतीय रेल्वेच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी सेवेतील १९९६ बॅचचे अधिकारी पुनीत अग्रवाल यांनी स्वीकारला. त्यांनी इती पाण्डेय यांच्याकडून हा पदभार स्वीकारला.

पुनीत अग्रवाल यांनी या पदावर नियुक्त होण्यापूर्वी ते नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) येथे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (प्रतिनियुक्त) या पदावर कार्यरत होते. अग्रवाल यांना विविध क्षेत्रांतील अनुभव व सखोल ज्ञान आहे.

यात प्रकल्प व्यवस्थापन आणि विकास, कॉर्पोरेट व्यवहार, बहुपक्षीय निधी व्यवस्थापन, मालवाहतूक तसेच लॉजिस्टिक्स, धोरणात्मक व्यवस्थापन, शहरी परिवहन,उच्च मूल्य खरेदी प्रक्रिया, रेल्वे ऑपरेशन्स, रोलिंग स्टॉक ऑपरेशन्स आणि देखभाल, रेल्वे विद्युतीकरण, हरित ऊर्जा, मानकीकरण आणि गुणवत्ता व्यवस्थापन तसेच कॉर्पोरेट कायदे (करार कायदे, कंपनी कायदे आदी ) यांचा समावेश आहे.

भारतीय रेल्वेमध्ये त्यांनी उल्लेखनीय सेवा दिली आहे. यासोबतच त्यांनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) मध्येही विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. प्रकल्प अंमलबजावणीचे नियोजन व वेळापत्रक, साहित्य व्यवस्थापन, देखभाल धोरण, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट (TQM) आणि ISO अंमलबजावणी यामध्येही त्यांचा विशेष अनुभव आहे. भुसावळ रेल्वे विभागातर्फे अग्रवाल यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली विभागात प्रगती, आधुनिकीकरण आणि कार्यक्षमतेत वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---