---Advertisement---
जळगाव, दि. 25 (प्रतिनिधी) : ओडिशा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत जळगावच्या पूर्वा चौधरी हिने उल्लेखनीय कामगिरी करत महिलांच्या ५३ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले आहे.
पूर्वा चौधरी ही जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू असून तिच्या या यशामुळे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रात गौरव झाला आहे. या स्पर्धेत तिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली.
तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणामुळेच पूर्वाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केल्याचे मानले जात आहे.
पूर्वाच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सदस्य कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.









