हाता-पायांची बोटे कापून कट्टरपंथीयांकडून युवकाची निघृण हत्या

#image_title

Crime News : एका हिंदू तरुणाचा मृतदेह अस्ताव्यस्त स्वरूपात पडलेला होता. मृतदेह हा दीपक कुमार नावाच्या व्यक्तीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना बुधवारी ८ जानेवारी २०२५ रोजी फरिदाबाद येथे घडली होती. दीपक हा १६ डिसेंबरपासून फरार होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी दीपक फरार असल्याची तक्रार केली. दीपकचा मृतदेह एका झुडपात अस्ताव्यस्त पडला होता. दीपकची काही बोटेही गायब असल्याचे दिसून आले होते.

पीडित दिपकचे कुटुंब हे त्याच सेक्टर ६२ विभागामध्ये वास्तव्यास होते. पीडितेचा भाऊ दिलीपने माहिती दिली की, दीपक १६ डिसेंबर रोजी दिसला होता. त्यानंतर दीपकच्या मृतदेहाची माहिती हाती लागताच पीडितेची ओळख पटली.

यावेळी स्थानिक पोलिसांनी या घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. बेपत्ता व्यक्तीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ डिसेंबरपासून पोलिसांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत, दीपकचा मृतदेह बादशाह खान सिव्हिस रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.

दीपकचा भाऊ दिलीप याने केलेल्या तक्रारीची प्रत सोशल माध्यमांवर शेअर केली होती. तक्रारीत दिलीपने नमूद केले होते की, त्याने फक्रुद्दीन, इद्रीस, अन्वर, आझाद, सोहेल, आणि इतर काही व्यक्तीविरोधात तक्रार केली. दिलीपच्या तक्रारीनुसार, दीपक हा एका अल्पवयीन मुलीच्या एका प्रकरणाचा साक्षीदार होता. त्यामुळे संबंधित आरोपींनी दीपकला धारेवर धरले असून दीपकशी त्यांचे वैर निर्माण झाले होते.

याप्रकरणात फरिदाबात पोलिसांनी सांगितले की, त्यांनी याप्रकरणाची दखल घेतली. यामध्ये आरोपींची शोधमोहिस सुरू ठेवण्यासाठी एक विशिष्ट पथके स्थापन करण्यात आली आहेत. काही माध्यमांच्या वृत्तानुसार दीपकचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत एका झुडपात आढळ्याची माहिती तापासादरम्यान समोर आली आहे.