शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू होत्या, आणि अखेर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ते उद्या, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी, दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
राजन साळवी यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि तीन वेळा आमदार अशी विविध पदे भूषविली आहेत. लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात त्यांचा मोठा प्रभाव आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवली होती. मात्र, अलीकडच्या काळात पक्षांतर्गत वाद आणि नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :कर्जाच्या हप्त्याने जुळले सूत ! नवऱ्याला सोडून विवाहितेने थाटला बँक कर्मचाऱ्यासोबत संसार
राजन साळवी यांच्या या निर्णयामुळे कोकणातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला कोकणात मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी राजन साळवी यांच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. त्यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाला थांबविण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा : सुनेच्या प्रियकराला सासूने बोलावलं भेटायला; मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही केला नसेल ‘विचार’
राजन साळवी यांच्या राजीनाम्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मोठा फटका बसणार आहे. कारण लांजा, राजापूर आणि साखरदा या विधानसभा मतदारसंघांचं राजन साळवी यांनी प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातील ते एक मोठं प्रस्थ असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा मजबूत गड होता. पण आता ठाकरेंचा हा गड ढासाळला आहे.
हेही वाचा : परळीतील निवडणूक वाद चिघळला! ८२ दिवसांनी गुन्हा दाखल, दमानियांनी मानले एसपी नवनीत कावत यांचे आभार