Jalgaon News : रामानंदनगर पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव: रामानंदनगर पोलिसांनी कुविख्यात घरफोड्यांच्या मुसक्या बांधत्या आहेत. आरोपींनी जळगाव शहरासह बुलढाणा जिल्हा व मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात चोऱ्या केल्या आहेत. चोरट्यांकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली. जियाऊल्ला खान असदऊल्ला खान (६०, रा.नांदुरा, जि. बुलढाणा) व सय्यद अफसर सय्यद अजगर (२२, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) अशी अटक केलेल्या  आरोपींचे  नावे आहेत.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील घरफोडी आणि ऑडिटर कॉलनीतील घरफोडी केल्याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल होता. दोन्ही घरफोडी करणाऱ्या टोळया ह्या सय्यद अफसर याच्या पिंप्राळा हुडको येथील घरात राहत असल्याची गोपनिय माहिती रामानंदचे हवालदार सुशील चौधरी यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सुचना मिळताच सोमवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत यांनी कारवाई करत संशयित आरोपीना अटक केली. त्याांचा एक साथीदार हा पसार झाला आहे. त्यांनी घरफोडी करण्याकरीत वापरलेली रिक्षादेखील जप्त केली आहे. तपास हवालदार जितेंद्र राजपूत हे करीत आहे.

यांनी केली कारवाई:

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक विठ्ठल पाटील, हवालदार जितेंद्र राजपूत, हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, हवालदार इरफान मलिक, नाईक हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी आदींनी केली.