---Advertisement---

Ration Card E-KYC : जळगाव जिल्ह्यातील ३०% लाभार्थ्यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप प्रलंबित, रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता

by team
---Advertisement---

Ration Card E-KYC : जिल्ह्यात सुमारे २७ लाख ६० हजारांहून अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानावर जाऊन अंगठ्याच्या ठशाद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे आहे. ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता असून केशरी तसेच पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना धान्य लाभ मिळणार नाही.

शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्यासाठी शासन स्तरावरून यापूर्वी डिसेंबर, मार्च अशी दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली असूनही आदिवासी बहुल चोपडा तालुक्यात अनेक शिधापत्रिकांधारकांचे ई-केवायसी झालेले नाही. तसेच जिल्ह्यातील ८ लाख ३९ हजार ५५२ रेशनकार्डधारक या प्रक्रियेपासून लांब असल्याने त्यांचा लाभ अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बोटांचे ठसे स्कॅनसह ई-केवायसी बंधनकारक

राज्यातील सर्व ग्राहकांच्या रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत. तरीदेखील वितरणात गळती होत असल्याचे दिसून आले आहे. गळती रोखण्यासाठी राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. एकात्रित कुटुंबातील नाव असलेल्या सर्व सदस्यांनी अद्ययावत असलेले आधारकार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये बोटांचे ठसे स्कॅन करून ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

तिसऱ्यांदा मुदतवाढ

शिधापत्रिकाधारकांना गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ई-केवायसी करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु, सर्व्हर डाऊनमुळे ई-केवायसी व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, शिधापत्रिका लाभधारक आणि स्वस्त धान्य दुकानदारांना पुन्हा सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणीमुळे ई-केवायसी करण्यात अडचणी आल्या.

मोबाइल अॅपद्वारा होणार ई-केवायसी

नव्याने शिधापत्रिकाधारकांसाठी घरी बसूनच मोबाइल अॅपमध्ये ग्राहक कॉर्नरवर जाऊन ई-केवायसी करण्याची सुलभ सुविधा देण्यात आली होती. यानंतरदेखील सर्व्हर डाऊन आणि ई पॉज मशीनम धील तांत्रिक अडचणींमुळे शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे बऱ्याच शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याने आता पुन्हा ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment