---Advertisement---

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गुटखासह १ लाखाचा मुद्देमाल जप्त

by team
---Advertisement---

रावेर : अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी रावेर पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहनासह सुमारे ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना बऱ्हाणपूरकडून एक टाटा मॅजीक वाहन गुटखा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळावी होती. यानुसार त्यांनी पोहेकॉ सचिन घुगे, प्रमोद पाटील, समाधान ठाकुर, विशाल पाटील, संभाजी बिजागरे यांच्या पथकाला कारवाईची सूचना दिली.

या पथकाने येथील रुची मोटर्स जवळ गुटखा वाहतुक करणाऱ्या एमपी- ६८, टी-०२२७ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली. यामध्ये त्यांना ७ गोण्यांमध्ये १ लाख १२ हजार ८०० रुपयांचा पान मसाला व तंबाखुयुक्त गुटखा मिळून आला. पोलीसांनी २ लाख रुपये कीमतीची टाटा मॅझीक गाडी असे ३ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुटखा राज्यात प्रतिबंधित असतांना गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालक नदिमखान ईस्माईलखान (वय ३५, रा. कोतवाल वाडा रावेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment