खरी शिवसेना–राष्ट्रवादी कोणाची ? आज फैसला होणार ? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष…!

---Advertisement---

 

एकीकडे महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत असताना मात्र आज पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे, गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद आज शेवटच्या टप्प्यावर अर्थात निर्णायक टप्प्यावर येऊन थांबलेला आहे. आज 21 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वाच्या व अखेरच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे दिल्लीकडे असल्याचं पहायला मिळत आहे.

गेल्या 21 जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर राज्याचं राजकारण तापलं आणि काही कालावधीनंतर एकनाथ शिंदे गटाला 17 फेब्रुवारी 2023 रोजी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं. यासह 02 जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली, तद्नंतर 6 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस नाव व घड्याळ चिन्ह हे बहाल केलं. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव व चिन्ह यावरून मोठ्या संघर्ष हा सुरू झाला, आणि या प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाचा शिवसेना हा पक्ष आणि अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अधिकृत पक्ष असल्याचा निर्णय दिला होता मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आणि शरद पवार गटाने विरोध करत सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं.

या संपूर्ण प्रकरणावर गेल्या तीन वर्षापासून न्यायालयात सुनावणी सुरू असून याबाबत कुठलाही ठोस निर्णय मात्र झाला नाही, दरम्यान सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या या सुनावणीला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं असून या सुनावणी दरम्यान होणाऱ्या निर्णयाचा परिणाम फक्त आणि फक्त पक्षाचे नाव किंवा चिन्हा पुरता मर्यादित राहणार नसून आगामी विधानसभा, लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा थेट परिणाम हा होणार आहे.

सुप्रीम कोर्टाने जर निवडणूक आयोगाचा निर्णय हा कायमस्वरूपी ठेवला तर सद्यस्थितीत सत्ताधारी पक्षांना मोठा दिलासा मिळू शकतो मात्र हाच निर्णय जर बदलला तर राज्यातील समीकरण बदलण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

त्यामुळे आज होणाऱ्या या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं असून महाराष्ट्रातील राजकारणासाठी हा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे त्यामुळे याकडे राजकीय पक्षांसह नेते व महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---