Railway Jobs: सुवर्णसंधी! रेल्वेत ३२००० पदांसाठी भरती, वयोमर्यादाही वाढवली

रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) लेव्हल १ पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण ३२,४३८ पदांची भरती केली जाईल.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार २३ जानेवारी २०२५ पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. त्याच वेळी, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे.

महत्वाची माहिती

एकूण पदे  32,438  

वयोमर्यादा  

नवीन: 18 ते 36 वर्षे

पूर्वी: 18 ते 33 वर्षे

अर्ज प्रक्रिया

प्रारंभ 23 जानेवारी 2025

शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025

हेही वाचा : प्रयागराज महाकुंभमध्ये सिलिंडर स्फोट नव्हे, खलिस्तानी कट! दहशतवाद्यांची कबुली

 अर्ज कसा कराल?

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. संबंधित लिंकवर क्लिक करा.

3. स्वतःची नोंदणी करा.

4. अर्जात आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.

5. पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण उमेदवारांसाठी ₹500

दिव्यांग, महिला, ट्रान्सजेंडर, SC/ST/EBC/माजी सैनिक/अल्पसंख्याक उमेदवारांसाठी₹250

उमेदवारांसाठी टीप

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. रेल्वे भरतीतील वयोमर्यादा वाढली असून उमेदवारांसाठी  ही मोठी संधी असून इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा!