Job Recruitment : सुवर्णसंधी! UCO बँकेत 250 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर माहिती

UCO बँकेने स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज 16 जानेवारी 2025 पासून सुरु झाले असून उमेदवार 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

महाराष्ट्रातील 70 जागांवर भरती प्रक्रिया
UCO बँक स्थानिक बँक अधिकारी पदासाठी 250 जागांसाठी भरती करत आहे. महाराष्ट्रातील 70 जागांवर अर्ज प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवार आपले अर्ज राज्यनिहाय भरू शकतात.

पात्रता आणि निकष
उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असावी.

वयोमर्यादा: 20 ते 30 वर्षे (ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट, एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षांची सूट).

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा: तर्क, संगणक योग्यता, बँकिंग जागरुकता, इंग्रजी भाषा आणि डेटा विश्लेषणाशी संबंधित प्रश्न असतील.

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

अर्ज शुल्क
SC/ST/PwD उमेदवारांसाठी: 175 रुपये.

इतर उमेदवारांसाठी: 850 रुपये.

अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.

अर्ज कसा करावा
1. UCO बँकेच्या अधिकृत वेबसाइट [ucobank.com](http://ucobank.com) वर जा.

2. ‘करिअर’ किंवा ‘रिक्रूटमेंट’ विभागात जा.

3. LBO भरतीसाठी अर्ज लिंक उघडा.

4. अर्ज काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

5. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.

महत्वाची तारीख
 अर्ज सुरु होण्याची तारीख: 16 जानेवारी 2025

अंतिम तारीख: 5 फेब्रुवारी 2025