तरुण भारत लाईव्ह । १२ मार्च २०२३। जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव काही रिक्त पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे. या पदानुसार अर्ज कसा करावा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
उपविभाग स्तरीय समन्वयक / Sub-Divisional Coordinator
पात्र उमेदवार हा शासनमान्य विद्यापिठाची MSW पदवी
02) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS-CIT ( शासन मान्य प्रमाणपत्र) (MD-Office चे ज्ञान आवश्यक)
03) मराठी टंकलेखन 30 व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनीट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावे.
04) कोणत्याही शासकीय कार्यालयात काम केल्याचा किमान १ वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवासास प्राधान्य राहील व वनहक्क कायदा / वनविभाग व आदिवासी विभागाशी निगडीत काम केलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील.
05) संबधित महसूल उपविभागातील रहीवासी असावा.
06) शासनमान्य विद्यापिठातून MSW पदवीप्राप्त उमेदवार उपलब्ध न झालेस BSW पदवीधरांचा विचार करण्यात येईल.
तुम्हाला किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना 13,000/- रुपये पगार मिळेल
अटी व शर्ती –
सदरच्या पदभरती करिता अर्जाचा विहीत नमुना www/Jalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलध्द करुन दिलेल्या विहीत नमुन्यात इच्छुक उमेदवारांनी समक्ष अर्ज सादर करावेत.
सदर नेमणूक पूर्णतः तात्पुरत्या स्वरुपाची असून जास्तीत जास्त ६ महिने कालावधी साठी करार पध्दतीने करावयाची आहे. ६ महिन्यानंतर आपले कामकाजबाबत समाधानकारक नसल्यास तसेच सदर कामाची आवश्यकता नसल्यास आपली नेमणूक कोणतेही कारण न सांगता संपुष्टात येईल.
निवड झालेल्या उमेदवासास मा.जिल्हाधिकारी यांचे अखत्यारीत काम करणे आवश्यक राहील. व त्यांच्याकडील निर्देशाप्रमाणे कामकाज करणे बंधनकारक राहील तसेच उमेदवारास कार्यालयीन वेळेत तसेच आवश्यकता असल्यास सुटीच्या दिवशी देखील कार्यालयात थांबून कामकाज करावे लागेल.
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी गैरहजर राहिल्यास एकत्रित मानधनातून त्या दिवसाचे मानधन कपात करण्यात येईल.
सदर पदभरती बाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी जळगांव यांनी राखून ठेवले आहेत.
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वनहक्क कायदा कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय फैजपूर, ता. यावल.