---Advertisement---

Jalgaon News: औरंगजेबाची कबर हटवा; विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे जळगावात ठिय्या आंदोलन

by team
---Advertisement---

जळगाव: शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी(17 मार्च) रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये क्रूर मुघल औरंगजेब याची कबर हटवण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.

विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र ही पवित्र संतांची भूमी तसेच भारत देश हा सनातन संस्कृतीला मानणारा देश आहे. या पवित्र भूमीवर क्रूर औरंगजेबची कबर असणे हे या देशासाठी अशोभनीय आहे.

औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणाने हत्या केली. तसेच गुरुगोविंद सिंग यांचे बाल साहेब जादे यांची भीतीमध्ये चिरून हत्या केली. गुरु तेजबहादुर सिंग यांची देखील त्याने हत्या केली.काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले , मथुरेतील असलेले सुंदर मंदिराचा विध्वंस यांनी केला. सोरटी सोमनाथ येथील मंदिरे यानेच पाडले. त्रंबकेश्वर जेजुरी अशा मंदिरांवर हल्ले केले. असंख्य हिंदूंवर धर्मांतरण करण्यासाठी हल्ले केले.

अशा या क्रूर औरंगजेबची कबर या पवित्र भारत देशामध्ये असणे म्हणजे देशामध्ये गुलामीचे प्रतीक असल्याचे भासते. म्हणून या आंदोलनाद्वारे शासनाला विनंती आहे की कायदेशीररित्या प्रशासकीय बाबीनुसार या कबर हटविण्यात यावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कार सेवा करण्यास पोहोचतील आणि कबर उध्वस्त करतील,असा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनामध्ये व निवेदन सादर करताना प्रांतमंत्री योगेश्वरी गर्गे, विभाग मंत्री शांताराम शिंदे, विभाग सहमंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा उपाध्यक्ष खंडु पवार, विभाग संयोजक राकेश लोहार, जिल्हा सह मंत्री राजेंद्र गांगुर्डे, शिवसेना शिंदे गट संतोष पाटील, भाजपाचे जितेंद्र मराठे, पियुष कोल्हे, निलेश तायडे, मनोज बाविस्कर, सतीश गायकवाड व सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment