तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । शहरातील सिंधी कॉलनी मेन रोड येथे भाजीपाला विक्री करणारे हातगाड्या लावत असून यामुळे अपघात व वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मनपाने लक्ष देऊन अतिक्रमण काढावे तसेच रस्त्यावर पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी राजा कुकरेजा, रा. सिंधी कॉलनी, जळगाव यांनी स्वीयसहायक निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजा कुकरेजा यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या सिंधी कॉलनी मेन रोड येथे भाजीपाला विक्री करणारे हातगाड्या लावतात. त्यामुळे अपघात व वाहतुकीची कोंडी होत असल्याने वेळेप्रसंगी हाणामारी व मोठमोठ्याने आवाज करून शांततेचा भंग होत असतो.
शहर महानगरपालिका यांनी लक्ष देऊन अतिक्रमण काढावे व रोड (रस्ता) मोकळा करावा. तसेच मागच्या आठवड्यात महानगरपालिकेचे अधिकारी यांनी पाहणी करून गेले असता तरी त्यावर काही एक कार्यवाही झाली नाही. तरी रहिवाशी यांची मागणी आहे. तरच महानगरपालिकेने फोर व्हीलर, टू व्हिलर, व हातगाड्या या पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर येवू नये म्हणून तेथे महानगरपालिकेने पांढरे पट्टे मारावेत. जेणेकरून रस्त्यावर गाड्या लागणार नाही व वाहतुकीची कोंडी होणार नाही.