Jalgaon News : विजयादशमी निमित्त शहरात रा.स्व.संघाचे पथसंचलन

Jalgaon News : विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी या पथसंचलनाला शहरातील विविध भागातून प्रारंभ होईल. एकूण तीन गटात हे पथसंचलन होईल.

दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीनिमित्त जळगाव शहरात संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार हे संचलन १) बिंदूबाई सोनवणे हॉल, कांचन नगर २) जुने श्रीराम मंदिर, ३) वानखेडे सोसोयटी दीक्षित वाडी या तीनही ठिकाणाहून सुरु होऊन टॉवर मार्गे जात जी.एस. ग्राऊंड येथे पथसंचलनाचा समारोप होईल. तरी स्वयंसेवकांनी आणि नागरिकांनी संचलन सुरु होण्याच्या ५ मिनिटांपूर्वी गणवेशात उपस्थित राहावे. असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आले आहे.