---Advertisement---
भुसावळ/शिरपूर : गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात होती. यासंदर्भातील गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हिरे यांनी पथकाच्या मदतीने तब्बल २८ गोवंशांची सुटका करण्यात आली. या अवैध वाहतूक प्रकरणी सात पैकी तीन संशयितांना अटक करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. दरम्यान,उर्वरित चौघे जंगलात पसार होण्यात यशस्वी ठरले आहेत. ही कारवाई, शुक्रवार , १८ रोजी करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत दोन वाहनांसह सात लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहा संशयीतांविरोधात गुन्हा
कढईपाणी (उमर्दा) येथे गोवंशाची कत्तलीसाठी तस्करी होत असताना पोलिस पथकाने छापेमारी करीत २८ गोवंशाची सुटका केली. यासोबत तीन लाख रुपये किंमतीची पिकअप (एम. एच. ०४ डी. के.५९३८) व पिकअप (एम. पी.६८ जी.०५८५) मिळून सात लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
---Advertisement---

गोवंशांची अवैध वाहतूक प्रकरणात संशयीत सयाराम उर्फ पुठ्ठण आनसिंग पावरा, दयाराम आनसिंग पावरा (कढईपाणी, उमर्दा), लतीफ शेख रज्जाक (४०, गणेश कॉलनी, शिरपूर), अबरार शेख अमीर शेख (शिरपूर), जाकीर मन्सुरी (मनावर, मध्यप्रदेश), जफर युसूफ मजावर (शिरपूर), बादल गंगाराम चौहाण (सेंधवा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील तीन संशयीतांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे, हवालदार संतोष पाटील, दिनेश सोनवणे, स्वप्नील बांगल, सुनील पवार, जयेश मोरे, चालक मनोज पाटील, चालक सागर कासार आदींच्या पथकाने केली.
