ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा SBI लाईफचे सदिच्छादूत…

---Advertisement---

 

मुंबई : एसबीआय लाईफ इन्शुरन्स या आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपनीने भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांची अधिकृत सदिच्छादूत (Brand Ambassador) म्हणून नियुक्ती केली आहे. जीवन विम्याबाबत जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. एसबीआय लाईफने ‘अपने लिये, अपनों के लिये’ या ब्रँड तत्त्वज्ञानावर आधारित नवीन जाहिरात मोहीम सादर केली असून, या मोहिमेत ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या जाहिरात फिल्म्समधून स्वप्नपूर्ती, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सुरक्षित भविष्यासाठी जीवन विम्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

या मोहिमेत ऋषभ पंत ‘जॉली’ या भूमिकेत दिसणार असून, तो उत्साही, आशावादी आणि आयुष्य मनमोकळेपणाने जगण्याचे धैर्य दाखवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे. तर रवींद्र जाडेजा ‘पॉली’ या भूमिकेत असून, शांतपणा, आत्मविश्वास आणि दूरदृष्टीचे प्रतिनिधित्व करतो. ही जोडी भारतीय कुटुंबांमधील दैनंदिन संवाद आणि निर्णय प्रक्रियेचे प्रतिबिंब दाखवते.

एसबीआय लाईफने भारतीय जीवनशैलीशी सुसंगत अशा दोन टेलिव्हिजन जाहिराती सादर केल्या असून, या जाहिरातींमधून जॉली आणि पॉली कथा स्वरूपात मार्गदर्शन करताना दिसतात. जाहिरातीचा शेवट ‘करो पुरे अपने इरादे, अपनों से किये सभी वादे’ या प्रभावी संदेशाने होतो. या मोहिमेच्या अनावरणप्रसंगी एसबीआय लाईफचे ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सीएसआर विभाग प्रमुख रविंद्र शर्मा म्हणाले, “ही मोहीम जीवन विमा अधिक सोपा, समजण्याजोगा आणि लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतीक आहे.” यावेळी ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांनी एसबीआय लाईफचे सदिच्छादूत म्हणून काम करताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. “आमच्या माध्यमातून कंपनीच्या प्रगतीला हातभार लागला तर त्याचा आम्हाला नक्कीच आनंद होईल,” असे त्यांनी सांगितले.

शूटिंगच्या पहिल्या दिवशी अनुभव नसल्याने थोडी घालमेल झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---