ऋषभ पंतची प्रकृती स्थिर, चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरीही सफल

तरुण भारत ।३१ डिसेंबर २०२२ । ऋषभ पंतच्या गाडीला उत्तराखंडच्या रुडकी येथे शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. यात पंतला चार ठिकाणी गंभीर दुखापत झाली.  आता त्यांची प्रकृती स्थिर असून  चेहऱ्यावरही प्लास्टिक सर्जरी सफल झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे अपघातानंतर बीसीसीआय त्याच्या पाठिशी खंभीरपणे उभे राहिले आहे. बीसीसीआयकडून पंतच्या प्रकृतीचे अपडेट दिले गेले. त्याच बरोबर त्याला हवी ते सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन बोर्डाकडून देण्यात आले. ऋषभवरील उपचार देखील बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली होत आह

ऋषभ पंत याचा अपघात रुडकी येथे शुक्रवारी पहाटे पाच वाजता झाला . अपघात झाल्यांनतर त्याला डेहराडून येथे मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत..ऋषभ पंत याला सगळ्यात जास्त जखमा डोकं आणि पायाला झाल्या आहे.याचा सर्वात पहिला फटका दिल्ली कॅपिटल्स संघाला बसणार आहे. त्याची दुखापत पाहता तो पुढील काही महिने किंवा वर्षभर क्रिकेट खेळू शकेल असे वाटत नाही. संघातून बाहेर केल्यानंतर आता पंतवर मोठे संकट आले. अपघातामुळे पंत पुढील काही महिने क्रिकेट मैदानापासून दूर राहणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय किंवा संघ व्यवस्थापन पंतला लगेच इतक्या मोठ्या स्पर्धेत मैदानात उतरवण्याची धोका घेणार नाही. बीसीसीआय पंतच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. त्याच बरोबर जे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत त्यांच्याशी देखील बोर्डाने संपर्क केला आहे. पंतला सर्वोत्तम उचार मिळतील आणि यातून बाहेर काढण्यासाठी बोर्डाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असे शहांनी फोनवरून त्याच्या आईशी संवाद करत आश्वासन दिले.ऋषभवरील उपचार देखील बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली होत आहे.

ऋषभ पंत च्या चेहऱ्यावर गंभीर दुखपत झाली असून डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्यांची प्लास्टिक सर्जरी केली आहे . रिषभ पंतच्या पाटील सुद्धा इजा झाली असून  त्याचा एमआरआय स्कॅन आज ३१ डिसेंबर रोजी होणार आहे . तसेच त्याला पाठीला सुद्धा दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले . आता त्याच्यावर डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत आणि त्याचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.