---Advertisement---

युझीसोबतच्या चर्चेबाबत आरजे महविशनं सोडलं मौन, म्हणाली…

---Advertisement---

RJ Mahwish on Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झालाय. दरम्यान, नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात चहल आरजे महविशसोबत स्पॉट झाला. यामुळे महविशचं नाव चहलसोबत जोडले जात आहे. अशातच महविशच्या एका सूचक पोस्टची सगळीकडे चर्चा होतेय.

महविश लोकप्रिय रेडिओ जॉकी असून, तिच्या इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. महविश आणि चहल यांचे मैत्रीचे नाते असल्याचे सांगण्यात येत आहे. महविशने इंस्टाग्रामवर आपले सुंदर फोटो शेअर केले आहेत आणि ती एक अभिनेत्रीही आहे, ज्यामुळे तिचा ग्लॅमर आणि स्टाईल चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

महविश सौंदर्यात धनश्रीला कडक टक्कर देते. महविश सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते, जिथे तिने तिचे अनेक सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा स्टाईल आणि ग्लॅमर पाहण्यासारखा आहे.

इंस्टाग्रामवर तिला १.४ दशलक्ष लोकांनी फॉलो केलं आहे. एक प्रसिद्ध रेडिओ जॉकी असण्यासोबतच, महविश एक अभिनेत्री देखील आहे. महविश लवकरच एका शोमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महविशला ‘बेस्ट मेगा एन्फ्लुएन्सर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने आपण फक्त आपले काम करत राहायचे. चुकीचे काम करायचे नाही, चुकीचे ऐकायचेही नाही, असं तिने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून म्हटलं आहे.

तसेच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून तिच्या करिअरचा प्रवासही सांगितला आहे. मी कधीकाळी ब्रँड प्रमोशनसाठी २००० रुपये घ्यायचे. आता मी चित्रपटाची निर्मिती करते. माझा हा सगळा प्रवास मी पाहिला आहे, असं माहवशने म्हटलंय.

माझी खूप सारी स्वप्ने पूर्ण झाली आहेत. एवढी सारी स्वप्न मी कधी पाहिलीदेखील नव्हती, असंही तिने म्हटलंय. सध्या महविशच्या या सूचक पोस्टची सगळीकडे चर्चा होतेय.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment