जळगाव : शहरातील पांजरापोळ गोशाळेमध्ये शुक्रवारी जिल्हास्तरीय संत संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात जिल्ह्यातील साधारण 300 संत व 15 साध्वी उपस्थित होत्या. त्या ठिकाणी, धर्मांतरण, मठ मंदिरांवर होत असलेले आक्रमण, लव जिहाद, हिंदू सुरक्षा, संस्कार जातीय व्यवस्थेपासून ते कुटुंब व्यवस्थेपर्यंतच्या विषयावर मार्गदर्शन झाले. यात त्यांनी हिंदूंनी एकत्रित येऊन संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क देखील 100% बजवावा आवाहन करण्यात आले.
सांस्कृतिक अभंग व एकात्मता मंत्र विजय महामंत्र या गायनाने संमेलनाची सुरुवात झाली प्रास्ताविक विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे यांनी केले. यावेळी आलेल्या सर्व महंतांचे स्वागत व सत्कार उपरणे देऊन करण्यात आले.
मंचावरून महामंडलेश्वर परमेश्वरानंदजी महाराज
या देशात हिंदूचा कणा असलेला संत हाच सुरक्षित नसेल तर धर्माचे रक्षण कसं होईल म्हणूनच जो या देशात हिंदू हिताचं विचार करेल तोच या देशावर राज्य करेल तसेच हिंदूंची सुरक्षा आपले हिंदू धर्मातील संस्कार आपल्या रूढी परंपरा चालीरीती या कशा आचरणात याव्या याबद्दल मार्गदर्शन केले.
संमेलनात पुस्तकाचे प्रकाशन
या संमेलनाच्या निमित्तानेच काही पुस्तकाचे प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले जसे एक गठ्ठा मतदानाचा धडा निर्मल वारी विकसित भारत व बोर्ड या पुस्तकाचे या संमेलनात उपस्थित मान्य संतांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले व पुस्तकाचा संचही या मानताना वाटप करण्यात आला.
श्री श्याम चैतन्य जी महाराज रवींद्र महाराज यांनी देखील आपले मुद्दे मांडले आपल्या मुद्द्यांमध्ये धर्मावर होत असलेले आक्रमण मठ मंदिरांची होत असलेली विटंबना महान पुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबना , यावर आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संदीप महाराज यांनी केले.
मंचावर उपस्थित
शास्त्री अनंत प्रकाशदास जी महाराज स्वामीनारायण गुरुकुल सावदा, महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली बेलदार वाडी, रविदास महाराज तरवाडे, श्री श्याम चैतन्य जी महाराज, योगी दत्त नाथ जी महाराज, मानेकर बाबा शास्त्री सावदा