---Advertisement---

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासह २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती !

by team
---Advertisement---

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) : मागील २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदू धर्माचा प्रसाराचे कार्य जोमाने करीत आहे. सनातन संस्थेने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती ही युवक यांना प्रेरणा देणारी आहे. यसोबतच आगामी १०० वर्षांपर्यंत दिशादर्शक ठरणारे आहे. सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ होत आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला, तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते मुख्ममंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला. या महोत्सवासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि कुंदा जयंत आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यामोह्त्सवात २३ देशांतील १९ हजारांपेक्षा अधिक भाविक सहभागी झाले आहेत. प्रकृतीस्वाथ्य ठिक नसतांनाही साधक आणि भक्तांच्या प्रेमासाठी महोत्सवासाठी उपस्थित असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या दर्शनाने उपस्थित साधक, हिंदुत्वनिष्ठ भारावून गेले होते. महोत्सवाचा प्रारंभ शंखनाद, गणेशवंदना आणि वेदमंत्रपठाणाने झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री सद्गुरु बह्मेशानंद स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पू. देवकीनंदन ठाकूर, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे वीजमंत्री सुदीन ढवळीकर, गोवा राज्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, ‘सुदर्शन न्यूज’चे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस आणि अभय वर्तक उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment