जळगावात वाळू माफियांना दणका, इतके वाहन जप्त

#image_title

जळगाव ।  जिल्ह्यात सध्या अवैध वाळू वाहतुकीचे प्रकरण गंभीर तापले आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होण्याबरोबरच अनेकांना जीव गमवावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी महसूल कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलत धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळील गिरणा नदी पात्रात धडक कारवाई केली आहे.

आठ ट्रॅक्टर जप्त; 8 जणांवर गुन्हा दाखल

बांभोरी गावाजवळ गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टरवर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत सर्व ट्रॅक्टर जप्त केले. तसेच, संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये अक्षय भास्कर पाटील, उज्वल कैलास पाटील, गणपत पुंडलिक नन्नावरे, जितेंद्र लक्ष्मण नन्नावरे, विशाल विजय सपकाळे, किरण त्रंबक पाटील, आणि ज्ञानेश्वर गुलाब पाटील (सर्व रा. पाळधी, बांभोरी) यांचा समावेश आहे.

जनतेला प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या कोणत्याही प्रकाराची माहिती स्थानिक प्रशासनाला तत्काळ द्यावी. यामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालता येईल आणि पर्यावरणाचा समतोल राखता येईल. जिल्ह्यातील या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर दडपण निर्माण झाले असून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.