सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जात असताना दरीत कोसळली बस!

तरुण भारत लाईव्ह : नाशिकमधील सप्तशृंगी देवीचं मंदिर हे साडे  तीन शक्तीपीठा मध्ये एक मानलं जात. सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणत गर्दी करतात आणि तिथला रस्ता नागमोळी वळणाचा असल्याने  व पाऊसाची संतधार सुरु असल्याने गडावरती अपघात होतच असतात. गडाजवळ प्रवाशांनी भरलेली राज्य मार्ग परिवहन बस दरीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बसमध्ये 20 हून अधिक लोक होते, बहुतेक पर्यटक आणि यात्रेकरू होते. जखमी प्रवाशांना वणी आणि नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे. बस खड्ड्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान बस खामगाव डेपोच्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना झाले.

https://twitter.com/PTI_News/status/1678974060754092032?s=20