Student suicide: शाळेच्या ‘फी’ ने घेतला विध्यर्थीनीचा बळी

एकीकडे  मुलींच्या संरक्षणासाठी, शिक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ सारख्या  योजना तयार करण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे अनेक खाजगी  शाळांमध्ये दरवर्षी फीमध्ये वाढ होत असते. ज्यामुळे अनेक विद्यार्थी व  पालकांमध्ये शाळेच्या फीविषयी  चिंता निर्माण होते.  फीच्या वाढीमुळे काही वेळा योग्य शिक्षण घेणाऱ्यांना विद्यर्थ्यांना  आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

असाच काहीसा प्रकार एकाविद्यार्थिनी सोबत घडला आहे. ज्यात शाळेतील फी च्या कारणामुळे विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे. शिक्षकाने मुलीला शाळेची फी भरली नाही म्हणून वर्गात  शिक्षा दिली होती, ज्यामुळे एका आठवीच्या विद्यार्थिनीने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबाने, त्यांच्या मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ झाला होता,असा आरोप केला आहे.

सुरतमधील गोदादरा येथून ही घटना उघडकीस आली आहे. प्रियांका नगर सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीने तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाचा आरोप आहे की मुलीने शाळेची फी भरली नव्हती, ज्यामुळे शिक्षकाने तिला शाळेत दोन दिवस शिक्षा दिली. शिक्षिकेने प्रियांकाला शाळेच्या  शौचालयाजवळ उभे ठेवले होते असा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : प्रयागराज महाकुंभमध्ये सिलिंडर स्फोट नव्हे, खलिस्तानी कट! दहशतवाद्यांची कबुली

दोन दिवसांपूर्वी ती शाळेतून घरी आल्यानंतर रडत होती. भावनाने मला शाळेने फी मागितल्याबद्दल सांगितले तेव्हा मी शाळेत शिक्षिकेला फोन केला आणि तिला पुढच्या महिन्यात फी भरण्यास सांगितले, परंतु तरीही भावनाला शाळेत त्रास दिला जात होता. म्हणूनच तिने हे पाऊल उचलले. असे विध्यर्थीनीच्या वडिलांचे म्हणणे आहे.

यासोबतच, वडिलांनी असेही सांगितले की मकर संक्रांतीच्या आधी, जेव्हा शाळेत परीक्षा होत होत्या, तेव्हा भावनाला परीक्षेला बसू दिले जात नव्हते. आता तिला शिक्षा करण्यात आली आणि दोन दिवस शाळेतील शौचालयाजवळ उभे राहण्यास भाग पाडण्यात आले. त्यांनी असेही सांगितले की सोमवारी त्यांचे कुटुंब एका नातेवाईकाच्या घरी गेले होते, संध्याकाळी तेंव्हा त्यांना आपल्या मुलीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिचा आधीच मृत्यू झाला होता. त्याच वेळी, शाळा व्यवस्थापनाने फीबद्दल बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.