---Advertisement---

Bhusawal Crime News : फिरायला निघालेल्या जेष्ठ नागरिकाला चारचाकीची धडक, जागीच मृत्यू

by team
---Advertisement---

भुसावळ  : येथे पायी जाणाऱ्या एक जेष्ठ नागरिकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच गतप्राण झाल्याची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली.  याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम लक्ष्मण जाधव (वय ६८) असे मयत झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.

जळगाव शहरातील राका नगर येथे विक्रम लक्ष्मण जाधव हे वृद्ध आपल्यापरिवारासह राहत आहेत. विक्रम जाधव यांनी त्यांचे मित्र सुभाष शुक्ला व रविशंकर जैन यांच्यासोबत २६  नोव्हेंबर रोजी भुसावळातील साक्री फाट्याशेजारी असलेल्या हॉटेल मधुबन येथे जेवण केलं. यानंतर ते रात्री ९ वाजता फिरायला निघाले. यावेळी एका अज्ञात चारचाकी वाहनाने विक्रम जाधव यांना जबर धडक दिली. या अपघातात डोक्याला व हाता पायाला गंभीर इजा झाल्याने विक्रम जाधव यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment