मुंबई : बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान नंतर बॉलिवूड किंग शाहरुख खानला देखील जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने मायानगरीत खळबळ उडाली आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून धमकी दिली जात आहे. बॉलिवूड मधील सुपरस्टार यांना धमकी मिळत असल्याने मुंबई पोलीस अलर्ट झाली आहे. शाहरुखला धमकी मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल ट्रेस केला असता तो रायपूरचा असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर पोलिसांचे पथक रायपूरला रवाना झाले आहे. पुढील तपास अद्याप सुरू आहे.
शाहरुख खान याला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. शाहरुख खानला ही धमकी देण्यामागचा हेतू शोधला जात आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक रायपूरला पोहोचले आहे. तेथे हे पथक या प्रकरणाची चौकशी करेल.
रायपूर येथून आला कॉल
वांद्रे पोलीस स्टेशनला शाहरुख खानला धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले की, शाहरुख खानला जीव वाचवायचा असेल तर आम्हाला करोडो रुपये द्या. अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल आणि त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. फोन करणाऱ्या आरोपीचे नाव फैजान खान असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने फोन बंद केला आहे. त्याचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बुधवारी संध्याकाळी उशिरा शाहरुख खान वांद्रे येथील पर्पल हेझ स्टुडिओमध्ये दिसला. सुपरस्टार येथे डबिंगसाठी आला होता. शाहरुखने पांढऱ्या शर्ट आणि काळ्या पँटसोबत काळी टोपी घातलेली दिसली. त्याचा कॅज्युअल लूक चाहत्यांना खूप आवडला. फोटोग्राफरांना टाळण्यासाठी शाहरुख खान हा छत्री घेऊन स्टुडिओबाहेर आला. मात्र तरीही फोटोग्राफर्सनी त्याचे फोटो काढले.
सुपरस्टार शाहरुख खान सलमान खाननंतर जीवे मारण्याची धमकी मिळालेला दुसरा बॉलिवूड अभिनेता ठरला आहे. मुंबई पोलिसांना एक कॉल आला, जो छत्तीसगडमधील रायपूरमध्ये ट्रेस करण्यात आला होता, ज्यामध्ये शाहरुख खानला धमकावत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली गेली होती.
धमकी मिळाल्यानंतर गुरुवारी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचे एक पथक रायपूरला पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर ही घटना घडली आहे. काळवीट मारल्याच्या आरोपावरून सलमानला लक्ष्य करणाऱ्या टोळीने धमकीमध्ये ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली.
गेल्या वर्षीही किंग खानला आल्या होत्या धमक्या
शाहरुख नेहमीच अंडरवर्ल्डच्या हिटलिस्टवर असतो. त्याच्या कारकिर्दीत यापूर्वी अनेकदा त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही पठाण आणि जवान या चित्रपटांच्या यशानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. अभिनेत्याने याबाबत महाराष्ट्र पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती, त्यानंतर त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली होती.