Sharad Pawar : शरद पवारांचे संसदीय राजकारणाबाबत मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत ?

बारामती:  राज्यात विधानसभा निवडणुकीची धुमधाम सुरु झाली आहे पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बारामती दौऱ्यावर असून सभा घेत आहेत. यावेळी बोलतांना शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचा विचार बोलून दाखविला आहे. शरद पवार यांनी आतापर्यंत १४ वेळेस निवडणूक लढवली आहे. ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा खासदार म्हणून दिड वर्षांचा कार्यकाळ अजून शिल्लक आहे. अशातच त्यांनी संसदिय राजकारणापासून दूर जाण्याचे संकेत दिले आहेत.

बारामती येथून शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या संकेताने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषी मंत्री पद भूषविले आहे. बारामती मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते. पक्षातील नवीन नेतृत्वाला संधी देत त्यांनी युगेंद्र पवार यांना बारामती मतदार संघात संधी दिली आहे.

युगेंद्र पवार यांच्या बारामती येथे प्रचार सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या असंही यावेळी शरद पवारांनी म्हटले आहे. 

शरद पवार प्रचार सभेत म्हणाले की, “मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, १४ वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या”.