शिंदखेडा : वाडीसह मेथी परिसरात मागील काही दिवसांपूर्वी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. वाडी धरणातील असलेल्या मोटारींची वायरी, पाईप मोटार चोरून नेण्याचे प्रमाणात काही दिवसांपासून वाढ झाली आहे. यातच वाडी गावातील एका मेंढपाळाच्या बंद घरात ठेवलेले सोने, चांदीचे दागिने व लाखो रुपयांची रोकड चोरटयांनी लांबविल्याचे घटना २ जून रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, वाडी येथील मेंढपाळ सिताराम विश्राम ठोंबरे ( ठेलारी) यांच्या घरात चोरी करण्यात आली. त्यांचे वडील व आई चोरी झालेल्या दिवशी गावालगतच तीन चार किलोमीटरवर असलेल्या मेंढ्यांचा मुक्काम या ठिकाणी आपल्या मुलाकडे संध्याकाळी गेले. जेव्हा ते दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतले. त्यांना दरवाज्याचे कुलूप तोडलेले दिसले. काहीतरी झाले असल्याचा त्यांना अंदाज आला व त्यांनी आपल्या मुलाला याबाबतचा सविस्तर अशी माहिती देताच त्यांचा मुलगा त्या ठिकाणी हजर झाला.

ज्यावेळी त्यांनी घरात प्रवेश केला त्यावेळी वस्तू ही इतरस्त पडलेल्या दिसल्या. घरातील कपाट आणि लोखंडी पेट्यांमधील सामान बाहेर काढत आत मधले ऐवज चोरला यात एक किलो चांदी एक तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच लाखाचा रोकडाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी चेतन माळी, पोलीस पाटील मोहन बेडशी हे देखील घटनास्थळी पोहोचले . त्यांनी श्वान पथकाच्या टीमलाही पाचरण केले. त्या ठिकाणी पडलेल्या वस्तूंचे ठसे ही तज्ञ एपीआय विनोद खरात, पीएसआय धनंजय मोरे, हवालदार प्रकाश भावसार यांनी देखील भेट देऊन परिस्थितीजन्य पुरावा गोळा केला. व पुढील तपासाला सुरुवात केली.
परिसरात गस्त वाढवा
वाडीचे सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांनी पोलिसांबाबत नाराजी व्यक्त करीत सांगितले की, वाडी गावात होणाऱ्या मोटार, वायर, यांची चोरी सतत होत असते. त्याबाबती तक्रार देऊ नये कुठलीही कार्यवाही होत नाही. रात्रीचे गस्तीचे पॉईंटही माहिती नाहीत. कुठल्याही प्रकारची गस्त घातली जात नाही त्यामुळे चोरट्यांना कुठलाही धाक नसल्याने गरीबाच्या घरात धाडसी चोरी चोरट्यांनी केली. विहिरीच्या खोदकामासाठी आणलेले व्याजाचे दीड लाख रुपये ही या चोरट्यांनी लंपास केले त्यामुळे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे लवकरात लवकर या चोरीचा तपास लावण्यात यावा. व रात्रीची पोलिसांची गस्त परिसरात वाढवावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करतोय.