केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी संत मुक्ताईची यात्रा असते. यंदाही यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, २६ रोजी रात्री केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असता, काही टवाळखोर तरुणांनी तिची छेड काढली.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात एकूण पाच जणांवर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : दुर्दैवी ! वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थिनीने केलं असं काही, दरवाजा उघडल्यानंतर सर्वच थक्क
टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्या. त्यानंतर या प्रकरणात 5 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तर, इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनंतर रक्षा खडसे व आरोपींच्या मित्रामधील फोनकॉल व्हायरल झाला आहे. रक्षा खडसे यांनी तीव्र शब्दात आरोपीच्या मित्राला खडसावलं आहे.
छेड काढणारे टवाळखोर शिंदें सेनेचे कार्यकर्ते
दरम्यान, मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची ज्या मुलांनी छेड काढली ती मुले शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. एफआयआरमधे नाव असलेले अनिकेत भोई, पियूष मोरे यांचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मोठी बातमी ! दोन दिवस आधीच धनंजय मुंडेंचा घेतला राजीनामा,’या’ व्यक्तीने केला मोठा दावा