---Advertisement---
---Advertisement---
Crime News : रेखीव, वळणदार, सुवाच्च व सुंदर हस्ताक्षर सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. हस्तक्षराला वळण देण्याचे काम शालेय जीवनापासून सुरु झालेले असते. यातच काही जणांचे हस्ताक्षर हे खराब असते. अशाच प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर खराब असल्याने त्या विद्यार्थांचे हात एका शिक्षकांने जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या शिक्षकांने खराब हस्ताक्षर असल्याने विद्यार्थाला प्रथम मारहाण केली. या मारहाणीनंतर त्याने विद्यार्थ्यांचे हात जाळून टाकले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली.
मुंबईतील मालंडमधील कुरार येथील ७ वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण करून खराब हस्ताक्षरामुळे त्याचे हात जाळल्याबद्दल एका खाजगी शिकवणी शिक्षकाला कुरार पोलिसांनीअ टक केली आहे. ही घटना कुरार गावातील एका आलिशान इमारतीत घडली, जिथे हा शिक्षक राहतो आणि क्लास चालवीत असतो.
कुरार पोलिसात स्टेशनचे तपास अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की, कुरार गावातील दिंडोशी न्यायालयाजवळील इमारतीत खाजगी क्लास चालवणाऱ्या या शिक्षकाने केवळ मुलाचे हस्ताक्षर चांगले नसल्यामुळे मेणबत्तीने या मुलाचे हात जाळले. या भयानक प्रकाराने मुलाच्या हातावर फोड आले. हा मुलगा रडत असतांना देखील शिक्षकाला त्याची दया आली नाही. कलासमधून घरी पोहोचल्यानंतर मुलाने त्याच्या कुटुंबाला घडलेली घटना कथन केली. मुलाने जे काही सांगितले ते ऐकून तेही स्तब्ध झालेत.
मुलाचा हात जाळल्याचे लक्षात येताच मुलाच्या कुटूंबाने लागलीच कुरार पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवर पोलिसांनी तातडीने कारवाई करत बुधवारी संध्याकाळी शिक्षकाला अटक केली. विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली.