---Advertisement---

धक्कादायक ! धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका, वाहकाने असे वाचविले प्रवाशांचे प्राण, पाहा व्हिडिओ

by team

---Advertisement---

तामिळनाडूत रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला, व यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. वाहकाने दाखविलेल्या सतर्कतेने बस मधील ३५ प्रवाशांचे प्राण वाचले. दिंडीगुल जिल्ह्यात, चालत्या बसमध्ये चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तो सीटवरच बेशुद्ध पडला. ही बाब वाहकाच्या लक्षात येताच त्याने समयसूचकता दाखवून मोठा अपघात होण्यापासून वाचविले.

चालकाला अस्वस्थ वाटत असल्याचे दिसतातच वाहक ताबडतोब चालकाच्या सीटवर गेला. त्याने हातांनी ब्रेक दाबत बस रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे आणून थांबवली. वाहकाच्या तत्परतेमुळे बस नियंत्रणाबाहेर गेली नाही. सर्व प्रवाशांचे प्राणही सुरक्षित राहिले. दरम्याने, बसमधील प्रवाशांनी चालकाला सांभाळण्याचा प्रयत्न करत आपत्कालीन सेवांना माहिती दिली. मात्र , चालकाचा जागीच मृत्यू ओढवला. या घटनेनंतर, प्रवाशांनी वाहकाच्या समयसूचकतीने व धाडसाने बसमधील प्रवाशांचे प्राण वाचविल्याने त्याचे कौतूक केले.

यावेळी प्रवाशांनी सांगितले की, जरवाहकाने वेळीच ब्रेक दाबले नसते तर बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली असती किंवा मोठा अपघात होऊ शकला असता. या घटनेने वाहकाची जबाबदारी आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता समोर आणली.



स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि परिस्थितीचा आढावा घेतला. चालकाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आणि प्राथमिक तपासणीत त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने पुन्हा एकदा रस्ता सुरक्षा आणि चालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे. या दुःखद घटनेमुळे चालकाचे कुटुंब आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, सर्वजण कंडक्टरच्या शौर्याला सलाम करत आहेत. लोक म्हणतात की त्याच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment