---Advertisement---
हैदराबाद : येथील बंजारा हिल्स भागातून लव्ह जिहादचा एक प्रकार उघड झाला आहे. ओळख लपवून पाकिस्तानी वंशाच्या फहाद अकील याने हिंदू महिलेशी प्रेमसंबंध ठेवले. यानंतर तिचे जबरदस्तीने धर्मांतरण करुन तिच्यासोबत लग्न केले. याबाबत पीडितेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तानी नागरिक असलेला फहाद अकील गोंडल याने आपले नागरिकत्व लपवून ठेवत बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळविल्याचा आरोप आहे. फहाद हा एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. त्याने त्याने हिंदू महिलेवर दबाव टाकून जबरदस्तीने तिचे धर्मांतरण केले. त्याने तिचे नाव दोहा फातिमा असे ठेवले. २०१६ मध्ये त्याने कीर्तीशी लग्न केले. परंतु, फहादने कीर्तीला सोडून दिले आहे. तो आता दुसऱ्या महिलेसोबत राहतो. त्यानंतर या हिंदू महिलेने धाडस दाखवत फहादविरुद्ध लुंगर हाऊस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पीडित महिलेने पोलिसांकडे आपबिती सांगितली की, फहादने तिचे जबरदस्तीने धर्मांतर केले. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांच्यात काहीही चांगले चालले नाही. दोघेही वेगळे राहत आहेत. तिने तिचा पती पाकिस्तानी असल्याचे माहित नसल्याचे सांगितले. महिलेचा आरोप आहे की फहाद जहाबिन फातिमा नावाच्या दुसऱ्या महिलेसोबत राहत आहे आणि तो लव्ह जिहादमध्ये सहभागी आहे. त्याच्या कुटुंबाकडे सर्व भारतीय कागदपत्रे आहेत. त्याने ‘मला धमकी दिली आहे की जर मी त्याला घटस्फोट दिला नाही तर तो मला मारेल’. असे सांगितले जात आहे की फहादने कीर्तीप्रमाणेच त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या महिलेलाही त्याच्या जाळ्यात अडकवले. कीर्तीला या विश्वासघाताची माहिती मिळाल्यावर तिने पोलिसांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी फहाद आणि दुसऱ्या महिलेलाही अटक केली आहे आणि धर्मांतर, फसवणूक करून अनेक लग्नांच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे.