---Advertisement---
जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या किमतींने झेप घेत नवा उच्चांक गाठला असून, सर्वात मोठी एकदिवसीय वाढ नोंदवत चांदीचा दर तब्बल ८,५०० रुपयांनी उसळी मारून प्रति किलो १,८८,००० रुपयांवर पोहोचला आहे. तर, सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २८ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहे.
बुलियनच्या आकडेवारीनुसार, शेअर बाजारात झालेल्या किरकोळ वाढीमुळे सोने आणि चांदीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमती ८३० रुपयांनी वाढून १,३०,००० रुपयांवर पोहोचल्या आहेत.
चांदीनेही ४,००० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे आणि १९१,६२० रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत आज सोन्याच्या किमती सुमारे ९०० रुपयांनी वाढल्या आहेत आणि चांदीच्या किमती ४,०८० रुपयांनी वाढून १,९२,००० रुपयांवर पोहोचल्या आहेत.
तर जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या किमतींने झेप घेत नवा उच्चांक गाठला असून, सर्वात मोठी एकदिवसीय वाढ नोंदवत चांदीचा दर तब्बल ८,५०० रुपयांनी उसळी मारून प्रति किलो १,८८,००० रुपयांवर पोहोचला आहे. तर, सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २८ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहे.









