Spa Center in Jalgaon : शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या देह विक्रीच्या व्यायवसायावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात असून स्पा सेंटरचा मालक व व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबात अधिक माहिती अशी, जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील नयनतारा ऑर्किड मॉलमध्ये डे स्पा सेंटर या नावाने शॉप (नं.४०८) येथे चालू होते. या स्पा सेंटरच्या आड ग्राहकांना शरीरसंबंधासाठी स्पा मसाज करणाऱ्या महिलांकडून देहविक्रय व्यवसाय करण्यात येत होता. या व्यवसायाला स्पा सेंटरचा मालक विक्रम राजपाल चंदमारी ढानी (वय २० वर्ष, हरीयाना) हा प्रोत्साहन देत होता. या प्रकरणी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी स्पा मसाज पार्लरवर एक बनावट ग्राहक पाठवला. बनावट ग्राहकाला स्पा सेंटरचा मॅनेजर राजू माधुजी जाट ( भिलवाडा, राजस्थान) याने स्पा मसाज व्यतिरिक्त इतर सेवा देण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर या सेंटरवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत स्पा सेंटरचा मालक व व्यवस्थापक यांना दोघां अटक करून त्यांच्या विरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर ४ पिडीत महिलांची सुटका करुन त्यांना आशादिप निराधार महिला वस्तीगृहात दाखल करण्यात आले.
ही कारवाई एलसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरिक्षक शरद बागल, महेश घायतड, सहा. फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनील पाटील, अक्रम शेख, वैशाली महाजन, प्रियंका कोळी, मंगला तायडे, दीपक चौधरी यांनी केली.