---Advertisement---

प्रवाशांना दिलासा ! महाकुंभातील गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचे नियोजन, विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

by team
---Advertisement---

Mahakumbh 2025: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक प्रवास करत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-दानापूर-नागपूर मार्गावर 12 विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन

महाकुंभासाठी प्रवाशांची वाढती गर्दी पाहता 26 फेब्रुवारीपर्यंत अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर-दानापूर दरम्यान आणखी काही विशेष गाड्या चालविण्याचा विचारही प्रशासन करत आहे.

हेही वाचा : Jalgaon News: शहरात 100 कोटींच्या निधीतील रस्त्यांची कामे दोन महिन्यांत पूर्ण करा- आ.सुरेश भोळे यांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या

विनातिकीट प्रवाशांवर कारवाईसाठी विशेष मोहिम

आरक्षित डब्ब्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमुळे अधिकृत तिकीट धारकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने कुंभमेळा विशेष गाड्यांमध्ये आजपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती नागपूर रेल्वे विभागाचे व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली.

प्रवासाचा वाढता ओघ

14 जानेवारीपासून आतापर्यंत नागपूर रेल्वे स्थानकातून सुमारे साडेआठ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. रविवारी प्रयागराजहून 330 रेल्वेगाड्या विविध मार्गांसाठी सोडण्यात आल्या होत्या, तर सोमवारी 191 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment