SSC Exam : दहावीची परीक्षा उद्यापासून, यंदा 57 हजार परीक्षार्थी

जळगाव : जिल्ह्यात दहावीची परिक्षा उद्या, १ मार्चपासून सुरु होत आहे. यंदा दहावीसाठी ५७ हजार ११० परिक्षाथी आहेत. त्यात मुले ३२ हजार ३७८ तर मुली २४ हजार ७३२ आहेत. या परिक्षेसाठी १४३ परिक्षा केंद्रे आहेत. ७९९ शाळा यासाठी आरक्षीत करण्यात आहेत. दरम्यान,  परीक्षा सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

७९९ शाळा, १४३ केंद्रांवर होणार परीक्षा
माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षांसाठी जिल्ह्यातील ७९९ माध्यमिक शाळा असून त्यात ५७ हजार ११० विद्यार्थी एसएससी बोर्ड परीक्षा प्रविष्ट होणार आहेत. यात ३२ हजार ३७८ मुले आणि २४ हजार ७३२ मुली अशी संख्या आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात १४३ केंद्र असून यापैकी तीन केंद्र संवेदनशील वा उपद्रवी केंद्र असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या तीन केंद्रांवर प्रशासनाची विशेष नजर असून जिल्ह्यात माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा कॉपी मूक्त वातावरण व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची देखील नियुक्ती केली आहे.

असे असेल भरारी पथक
दहावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके नियुक्त केले आहेत. यात तहसीलदार, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे तसेच प्रत्येक केंद्रावर एक बैठक देखील नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागांतर्गत विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.