Stock market : देशांतर्गत शेअर बाजार आज किंचित घसरणीसह बंद झाले. निफ्टी ४२ अंकांनी घसरून २३,६९६ वर बंद झाला. सेंसेक्स ३१२ अंकांनी घसरून ७८,२७१ वर बंद झाला आणि बँक निफ्टी १८५ अंकांनी वाढून ५०,३४३ वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप ४५८ अंकांच्या वाढीसह ५४,२७९ च्या स्तरावर बंद झाला.
Top gainer?
निफ्टीवर, Hindalco, ITC Hotels, ONGC, Apollo Hospital, BPCL मध्ये सर्वात तेजी पाहायला मिळाली. तर BSE वर ERIS LIFESCIENCES, JUBILANT PHARMOVA, GLOBAL HEALTHआणि MOTILAL OSWAL FIN हे शेअर्स तेजीत होते.
हेही वाचा : मुलीशी अनैतिक संबंध, घरी बोलावून बापाने विवाहित प्रियकराला संपवलं; घटनेमुळे परिसरात खळबळ
Top loser?
निफ्टीवर, Asian Paint, Titan, Nestle, Britannia, Tata Consumer या शेअर्स मध्ये घसरण झाली. तर BSE वर THERMAX -, FINE ORGANICS, SOBHA LTD – आणि PHOENIX MILLS – या शेअर्स मध्ये घसरण पाहायला मिळाली.
सकाळी व्यापाराची चांगली सुरूवात झाली होती. सेंसेक्स ७८,७३५ च्या उच्चांकावर गेला. पण त्यानंतर थोडा संमिश्र सेशन दिसला. निफ्टी २३,८०७ च्या उच्चांकावर गेला होता, पण त्यानंतर तो २३,७७१ च्या आसपास व्यापार करत होता. बँक निफ्टीमध्ये चांगली तेजी होती. आणि तो ५०,४१० च्या उच्चांकावर गेला.
व्यापार युद्धाची चिंता कमी होण्याची आणि चांगल्या निकालांच्या आधारे अमेरिकेच्या बाजारात दोन दिवसांनी चांगली तेजी दिसली. डाऊ जवळपास साडे तीनशे अंकांनी चढला आणि नॅस्डॅक दोनशे पंधरा अंकांपेक्षा जास्त वाढून दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला. सकाळी GIFT निफ्टी ७० अंकांची वाढ घेत २३,८५० च्या आसपास होता. डाऊ फ्युचर्स सपाट होते आणि निक्केई ७५ अंकांनी वर दिसत होता.
कालच्या जोरदार तेजीमध्ये FII ने कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून १३,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली. २ जानेवारीनंतर पहिल्यांदाच FII ने कॅशमध्ये खरेदी केली, तर स्थानिक फंड्सने ३५ ट्रेडिंग सेशननंतर ४०० कोटी रुपयांची लहान विक्री केली.