महावितरणच्या धोरणाविरोधात जळगावात सौर उद्योजकांचे जोरदार आंदोलन

---Advertisement---

 

जळगाव : सौर ऊर्जा क्षेत्रातील धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आज जळगावात सौर उद्योजकांनी आंदोलन छेडले. Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) च्या कथित मनमानी कारभाराविरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

हातात फलक आणि बॅनर घेऊन आंदोलकांनी “अधिकार, नाही कुणाचा उपकार”, “सोलर हा हक्क आहे” अशा घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या ग्राहकांवर अन्याय केला जात असून MSEDCL कडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
“सौर ऊर्जा झाली जेरेबंद… MSEDCL ची मनमानी!” तसेच “हरित ऊर्जा निर्मिती करणे हा जणू गुन्हा असल्यासारखी वागणूक” दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला. व्यापारी व औद्योगिक ग्राहकांना अडचणीत आणले जात असून ग्राहक हक्कांचे उल्लंघन होत असल्याचेही आंदोलकांनी म्हटले आहे.

हे आंदोलन ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन, टीम जळगाव यांच्या वतीने करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात MSEDCL च्या अँटी-सोलर धोरणामुळे सौर क्षेत्रात हाहाकार माजल्याचा आरोप संघटनेने केला.

सौर उद्योग व ग्राहकांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---