---Advertisement---
पाचोरा : चिकाटीने व नियमितपणे अभ्यास करा यश नक्की मिळेल असे प्रतिपादन पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले. ते जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा येथे आयोजित गणित सप्ताहाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थांवरून बोलत होते. प्रास्ताविक शेख जावेद रहीम यांनी केले. तर पदवीधर शिक्षक खिजरोददिन सातभाई या उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. यावेळी मुख्य अतिथी म्हणून केंद्रप्रमुख अब्दुल कदिर हे उपस्थित होते.
तहसीलदार विजय बनसोडे यांनी पुढेसांगितले की, मी सुद्धा जिल्हा परिषद मराठीशाळेततूनच शिक्षण घेतले आहे. आपल्याला धनप्राप्तीसाठी,नोकरी किंवा अधिकारी बनण्यासाठी नाही तर चांगला माणूस बनण्यासाठी व मानवतेची सेवा करण्यासाठी अभ्यास करायचा आहे.विध्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन केल्यास त्यांना यश नक्की मिळेल. लहानपणा पासूनच वाचनाची आवड निर्माण करावी. माझी स्वतःचे एक लायब्ररी आहे.
माझ्या मोबाईल मध्ये ही काही बुक्स पीडीएफ फॉर्ममध्ये आहे. प्रवाससामध्ये किंवा फ्री टाईममध्ये मी वाचन करतो. सर्व विद्यार्थ्यांनी मोबाईल व वाईट संगत पासून दूर राहावे असे आवाहन केले. बौद्धिक व शारीरिक विकासासाठी अभ्यास सोबत खेळामध्ये ही सहभाग घ्या.
जात-पात, पंथ, वर्ग सोडून देश हितासाठी काम करा. आपला देश सुंदर आहे. तुम्ही उर्दू भाषेत शिकतात. खाजगी शाळा असो किंवा सरकारी शाळा शाळा आहे. कोणतीही भाषेत शिका,भाषा यश प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण करत नाही. कारण की मी सुद्धा मराठी माध्यमातून व जिल्हा परिषद शाळेतून शिकलो आहे. त्यांनी सर्वांना मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी कन्या उर्दू शाळेतून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचे कौतुक करून सत्कार केले. त्यांच्या हस्ते गणित सप्ताहामध्ये प्रथम, द्वितीय ,तृतीय आलेले विजेत्यांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
शेख जावेद रहीम यांनी . सूत्रसंचालन व आभार मानले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मोहसीन मूसा खान, इमरान खान,सईद शब्बीर,नासिर शेख, इम्रान शेख, सलमान शेख, वाजिद शेख, इमरान शेख,आसिफ बागवान,अकील बागवान, आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक एजाज रऊफ, शाएदा हारून, शाहेदा युसुफ,जावेद रहीम, खिजरोद्दिन सातभाई, शोएबा सातभाई,अंजुम इकबाल,यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.