जळगाव : गावठी कट्टा बाळगून दहशत माजविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे २० हजार रुपये किमतीचा (गावठी कट्टा ) मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS NO ९९/२०२५ आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवार, ३ रोजी घोडसगाव ता. मुक्ताईनगर येथील अर्जुन कोळी हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा जवळ बाळगत असल्याची गोपिनीय माहिती मिळाली. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी माहिती घेतली असता अर्जुन कोळी हा घोडसगाव ते मुक्ताईनगर रोडवरील प्रेम प्रतिक टि सॅन्टर जवळ असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी प्रतिक टि सेंटर जवळ जावून मिळालेल्या बातमीची खात्री केली. दरम्यान, एक संशयीत इसम यास ताब्यात घेऊन त्याचे नांव-गाव विचारले असता त्याने त्याचे नांव अर्जुन जनार्दन कोळी (वय ३०या) रा.घोडसगाव ता. मुक्ताईनगर जि. जळगाव असे सांगितले. त्यानुसार तास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अंदाजे २० हजार रुपये किमतीचा (गावठी कट्टा ) मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS NO ९९/२०२५ आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, पोह प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, रविंद्र चौधरी सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी ही कारवाई केली.